Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Monsoon Update : राज्यात आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार

पुणे : राज्यात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास खोळंबला. मात्र राज्यात आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात तीव्र गतीने वारे वाहणार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई आणि पुण्याला बॉम्बफोट घडवण्याची धमकी, २ लाख रूपयांची मागणी

जळगाव जिल्ह्यात अद्यापही पाऊस सक्री झालेला नाही. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ४० अंशखाली आल्यानं दिलासा मिळाला. मात्र पावसाने हजेर लावली नाहीय. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यानुसार जळगाव जिल्ह्याला २४ आणि २५ जून रोजी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button