breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई आणि पुण्याला बॉम्बफोट घडवण्याची धमकी, २ लाख रूपयांची मागणी

मुंबई : मुंबई पोलिसांना आलेल्या एका धमकीच्या फोनमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने मुंबई आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. तसेच त्याने मुंबई पोलिसांकडे आपली मागणीही केली आहे. दरम्यान, हा फोन केणी केला याचा शोध सध्या मुंबई पोलिस घेत आहेत.

मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे म्हटले. गुरूवारी सकाळी १० वाजता मुंबई पोलिस कंट्रोलला फोन केला. त्याने म्हटले की, २४ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट करणार आहे. परंतु आपणास दोन लाख रूपयांची गरज आहे, ही रक्कम मिळाल्यानंतर आपण बॉम्बस्फोट थांबवू शकतो, असंही त्या व्यक्तीने म्हटलं आहे.

हेही वाचा – CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारने दिलेले ‘ते’ आदेश रद्द

मुंबई पोलिसांना हा धमकी चा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून आला असल्याचं समजतं आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५(१) (बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button