TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस 

वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मुंबई : राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्षभराचे वेतन ( रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ ) मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत.त्याबाबतचा धनादेश आणि संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान सादर केले. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणारे ते पहिलेच मंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१, १८,२८६ मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश आणि संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले.

राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तसेच पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना,बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, या जिल्ह्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भेटी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन मदत करण्यात देखील संकटमोचक ठरले आहे. आपला वर्षभराचा पगार देणारे ते राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहे. सद्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन रु. ३१ , १८ , २८६ त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. अनेक सेवाभावी संस्था संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी देखील मानधन दिले आहे.

राज्यात मुसळधार पाऊस , तसेच महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. राज्याच्या जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे, राज्य सरकारकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा म्हणून माझ्या सध्याच्या मंत्री पदाच्या वर्षे भराचे एकूण पगार रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ मुख्यमंत्री सहायता निधीस देत आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button