Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; रिश्टर स्केलवर तीव्रता २.८

रत्नागिरी: रत्नागिरी  जिल्ह्यात गुरुवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर व रेखांश ७३.४४ पूर्व या दरम्यान रत्नागिरी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –  ‘आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक’; ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने काही काळ नागरिक घराबाहेर आले होते. दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button