Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक’; ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून तालुका व जिल्हा व्यवस्थापक विविध शासकीय अभियानांदरम्यान महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच संगणक तज्ञ ब्लॉक व्यवस्थापकांच्या माध्यमातूनही अनेक कामे प्रभावीपणे पार पडत आहेत. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत कार्यरत तालुका, जिल्हा व ब्लॉक व्यवस्थापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

मंत्रालयात आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत कार्यरत तालुका, जिल्हा व ब्लॉक व्यवस्थापक संघटनेसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स्नेहल अडसूळ, सहायक कक्ष अधिकारी स्नेहा खोत तसेच आपले सरकार सेवा केंद्र ब्लॉक व्यवस्थापक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्र–कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, एआय व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला गती देणार’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाशी संबंधित कंत्राटी कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या सेवेत सातत्य राहील आणि वेतनासंदर्भातील अडचणी निर्माण होणार नाहीत. तसेच संघटनेने मांडलेले विविध प्रश्न सकारात्मकतेने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button