‘मराठी गया तेल लगाने..’; सुरक्षा रक्षकाचा माज, मनसे सैनिकांकडून चोप

मुंबई | पवईतील ‘एल अँड टी’ (L&T) कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने “मराठी गया तेल लगाने!” असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केल्याचा प्रकार मुंबईतल्या पवईमध्ये घडला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या मनसैनिकांनी अपमान केला. या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली लगावत आणि खडे बोल सुनवत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली.
मराठी भाषेबाबत मुजोरी दाखवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी कानशिलात लगावली आणि मराठी गया तेल लगाने म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगला धडा शिकवला. यानंतर मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला घेराव घातला. तू किती वर्षे मुंबईत राहतो आहे? सुरक्षा रक्षक म्हणाला चार वर्षे. यानंतर मनसैनिकांनी त्याच्याकडून माफी मागून घेतली ती अशी. “मी मराठीचा अपमान केला त्याबद्दल राज ठाकरेंची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, मराठी माणसांचीही माफी मागतो. यापुढे मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन.” असं म्हणत मुजोरी दाखवणाऱ्या सुरक्षा रक्षकाने माफी मागितली.
हेही वाचा : Narendra Modi | ‘मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय’; संजय राऊतांचं विधान
यानंतर मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला कामावर ठेवणाऱ्या सुपरवायझरलाही फैलावर घेतलं. याला कामावर ठेवलं आहे चार वर्षांपासून आणि त्याला मराठी कशी येत नाही? जो माणूस मराठी बोलायला येईल त्याच्याशी मराठीत बोला. मराठी गेली तेल लावत वगैरे ऐकून घेणार नाही. ज्याला मराठी येत नसेल त्याने ती शिकावी. ज्यांना समजतं आहे त्यांनी मराठी माणसांशी संवाद साधावा पण मराठी गया तेल लगाने हे महाराष्ट्रात ऐकून घेणार नाही असा सज्जड दम मनसैनिकांनी त्या सुपरवायझरलाही भरला.