LPG सिलिंडर झाला स्वस्त! पाहा आजचे नवे दर

नवी दिल्ली : देशात आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांमुळे ही दर कपात करण्यात आली असून, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे, तर १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा – जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार : मुख्यमंत्री फडणवीस
व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता पाच रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या दरांनंतर ही कपात करण्यात आली आहे.
दिल्ली: येथे व्यावसायिक सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्त होऊन तो आता १,५९०.५० रुपयांना उपलब्ध होईल.
मुंबई: येथेही ५ रुपयांची कपात करण्यात आल्याने दर १,५४२ रुपये झाला आहे.
कोलकाता व चेन्नई: या शहरांमध्ये ४.५० रुपयांची कपात करण्यात आली असून, आजपासून नवे दर अनुक्रमे १,६९४ रुपये आणि १,७५० रुपये झाले आहेत.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १५.५० रुपयांनी महागला होता.




