Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बांधकाम ३० जुलैपर्यंत पूर्ण करा’; मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम ३० जुलैपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार अमल महाडीक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर असून विद्यार्थ्यांना आधुनिक व सर्व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बांधकामाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये. संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करून कामाची गती वाढवावी आणि ३० जुलैपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात यावा या संदर्भात स्थानिक पातळीवर काही अडचणी उद्भवल्या तर या अडचणींचे तातडीने निराकरण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

बैठकीत महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक सुविधा आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button