Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट भागामध्ये प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयोजित बैठकीत देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक पार पडली.

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रलंबित आरोग्यविषयक प्रकरणावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

हेही वाचा –  म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत

अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट भागामध्ये आदिवासी बांधवांना प्रभावी आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी. याची खबरदारी घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागास नियमित भेटी देण्याचे निर्देश यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आवश्यक बांधकाम निधी उपलब्ध करण्यासह, कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रिकामी जागा नगर परिषदेस हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बोरखेडी फाटक आणि देवळीगुजर येथील नव्याने बांधलेल्या दोन उपकेंद्रांसाठी प्रत्येकी तीन पदे अशा एकूण सहा पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव, याशिवाय नागपूर येथील नव्या जिल्हा रुग्णालयासाठी १५८ पदे, उमरेड येथे ट्रॉमा केअर युनिटची पदनिर्मिती, तसेच कुही येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुधारित खर्चाच्या प्रस्तावास गती देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी व डे-केअर किमोथेरपी सुविधा पीपीपी तत्त्वावर सुरू करणे, दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांवरून १०० खाटांवर श्रेणीवर्धन करणे, ट्रॉमा केअर युनिट, सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, नागपूर व अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक, अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button