Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतजमीन, मालमत्ता खरेदी-विक्री दस्त नोंदणीत चूक झाली तर दुरुस्त कशी करायची?

मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये दस्तऐवजांची शुद्धता आणि अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. कागदपत्र तयार करताना नकळत टायपिंगच्या किंवा संख्यात्मक स्वरूपाच्या काही त्रुटी राहू शकतात. अशा चुका वेळीच दुरुस्त न केल्यास त्या कायदेशीर गुंतागुंतीचे कारण ठरू शकतात. अशा वेळी, सुधारित दस्तऐवज हा एक उपयुक्त पर्याय ठरतो.

सुधारित दस्तऐवजाद्वारे मालमत्तेच्या व्यवहारातील लेखी, अंकात्मक किंवा वाक्यरचनेशी संबंधित छोट्या चुका सुधारल्या जातात. मात्र, ही सुधारणा केवळ तांत्रिक स्वरूपाची असावी आणि मूळ करारातील अटी किंवा मालमत्तेच्या स्वरूपात कोणताही बदल करता येणार नाही.सुधारित दस्त तयार करताना मूळ व्यवहाराशी संबंधित सर्व पक्षांचा तपशील, त्यांचे संमती पत्र, तसेच सुधारणा करण्याची कारणे नमूद केली जातात.

हेही वाचा  :  Uddhav Thackeray | ‘भाजपाचा वक्फच्या जमिनींवर डोळा’; उद्धव ठाकरेंचा आरोप 

व्यवहारात सामील असलेल्या दोन्ही पक्षांनी सुधारित मजकुरावर मान्यता देणे गरजेचे असते. करारातील प्राथमिक अटी किंवा मालमत्तेच्या अधिकारांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, याची खात्री केली जाते. जर दस्तऐवज धारकाच्या मृत्यूनंतर सुधारणा आवश्यक असेल, तर कायदेशीर वारसांची मान्यता घेणे बंधनकारक असते.

जर दस्तऐवजात त्रुटी आढळल्यास, त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित उपनिबंधक कार्यालयात जाऊन योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. सुधारित दस्तासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.तसेच किरकोळ बदलांसाठी दोन्ही पक्षांची सहमती आवश्यक असते. मोठ्या प्रमाणातील दुरुस्ती करण्यासाठी, संबंधित पक्षांसह दोन साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक असते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button