Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात गेल्या पाच वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमान; अकोला येथे पारा ४६.९ अशांवर

मुंबई : अकोला येथे एप्रिल महिन्यातील मागील पाच वर्षातील, एप्रिलमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. तेथे ४६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यापूर्वी एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान (४७.७) अकोला येथेच २०२९ मध्ये नोंदले गेले होते. दरम्यान राज्यात सध्या कोरडे हवामान असून पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. विदर्भात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम आहे.

पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या देशासह राज्यातील नागरिकांना हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे.

राज्यात सध्या प्रतिचक्रवाती स्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ नोंदली जात आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातही उन्हाचा तडाखा वाढला असून कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून सोमवारी राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती असून यामुळे तेथील बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान सरासरीहून ३ ते ४ अंश अधिक नोंदले जात आहे. वर्धा, अमरावती आणि अकोला आदी भागात सातत्याने पारा ४५ अशांवर पाहोचत असून रविवारी अकोला येथे ४६. ९, अमरावती ४६.८, वर्धा ४६.४, तर यवतमाळ येथे ४६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील बहुतांश भागातील पारा ४२ ते ४५ अंशाच्या दरम्यान नोंदला गेला.

अमरावती येथे एप्रिल २०१९ मध्ये ४६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यांनतर सात वर्षांनी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. येथे ४६.८ अंश सेल्सिअस कमाल नोंदले गेले . तर वर्धा येथे एप्रिल १९९६ मध्ये ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. येथे तीस वर्षांनी रविवारी पुन्हा एकदा ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, अकोला, अमरावती आणि वर्धा आदी जिल्ह्यांत उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती लक्षात घेऊन या भागांना सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानातही वाढ नोंदली जात असून या प्रदेशातील सर्वाधिक तापमान छत्रपती संभाजीनगर येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तसेच नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा आदी भागात सोमवारी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या भागांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे रविवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. त्यामुळे या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळीही आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारपासून कोकण प्रांतात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण प्रातांत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी डहाणू येथे झाली. येथे ३७.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर मुंबईत हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३३.८ तर कुलाबा केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबई शहरात सोमवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाढलेल्या आद्रतेमुळे असलेल्या तापमानापेक्षा जवळपास २ अंश सेल्सिअसने ते अधिक वाटत होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button