ते काँग्रेसचे महाराष्ट्र केसरी होते, मात्र…; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अशोक चव्हाणांवर टीका

नांदेड : काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये महाराष्ट्र केसरी होते, आता भाजपामध्ये जाऊन ते जत्रेतील नुरा कुस्त्या खेळत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.नांदेडमध्ये काँग्रेस तर्फे तिरंगा रॅली आणि जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाना साधला.
स्व. शंकरराव चव्हाण हे हिंद केसरी होते. केंद्रात त्यांनी अनेक पदे सांभाळली, काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले होते. अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसमध्ये असताना दीर्घकाळ आमदार खासदार राहिले. प्रदेशाध्यक्ष देखील राहिले. अशोक चव्हाण पक्षात महाराष्ट्र केसरी होते. काँग्रेस मध्ये राहून महाराष्ट्र केसरीचे कुस्त्या लढायचे, आता मात्र भाजप मध्ये जाऊन अशोक चव्हाण हे नुरा कुस्त्या खेळत असल्याची बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार अस चव्हाण शंखनाद सभेत म्हणाले मला त्यांच्या अवस्थेवर दुःख होते ते मी व्यक्त केल्याचे सपकाळ म्हणाले.
दरम्यान पाकव्याप्त कश्मीर प्रमाणे पाकव्याप्त काँग्रेस झाली आहे, अशी टीका नांदेड येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर सपकाळ यांनी पलटवार करताना जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी भाजपाचे संबंध होते, तेव्हा भाजपने त्यांचा इतिहास पाहावा असे म्हणाले. पावसामुळे मुंबई तुंबली होती, फडणवीस यांचा भ्रष्टाचार तुंबला होता अश्या शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली.