आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणे सामान्य

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव

मुंबई : उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो. या ऋतूत, बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष देतात, परंतु अनेकदा पायांची काळजीकडे दुर्लक्ष होते. परिणामी पायांच्या टाचांना भेगा पडतात. हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणे सामान्य आहे. पण जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर ते चिंतेचा विषय असू शकते. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की पायांच्या त्वचेचा जास्त कोरडेपणा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणे आणि चुकीचे पादत्राणे घालणे.

जर उन्हाळ्यात तुमच्या पायांच्या टाचांना भेगा पडत असतील आणि वेदना होत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. या लेखात, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा मऊ आणि गुळगुळीत होतील.

उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची कारणे
टाचांना भेगा पडू नयेत म्हणून, प्रथम त्यांची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची ही मुख्य कारणे असू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. याशिवाय, जास्त वेळ अनवाणी चालल्याने त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. घट्ट, सिंथेटिक किंवा निकृष्ट दर्जाचे पादत्राणे घातल्याने टाचांना लवकर तडे जाऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता देखील टाचांना भेगा पडू शकते.

हेही वाचा –  एआयद्वारे एफआयआर दाखल करणार का? पोलीस आयुक्त म्हणाले, “तोपर्यंत पोलिसांच्या नोकऱ्या…”

हे घरगुती उपाय करून पहा

रात्री झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाचा वापर करा

नारळच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे भेगा पडलेल्या पायांच्या टाचा लवकर बऱ्या होतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर टाचांना नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. नंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसेच राहू द्या. दररोज असे केल्याने काही दिवसांत तुमच्या टाचा मऊ होतील.

मध आणि कोमट पाण्याचा वापर

मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते त्याशिवाय पायांच्या काळजीसाठी भेगा पडलेल्या टाचांना बरे करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात तुमचे पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हलक्या हातांनी स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि थोडी क्रीम लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने टाचा लवकर बऱ्या होतात.

कोरफड आणि ग्लिसरीन लावा

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि उपचार करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला मऊ करतात. अशा परिस्थितीत तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी, 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा. रात्री टाचांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. कोरफड टाचांना आतून पोषण देते आणि त्यांना जलद बरे करते.

केळीचा पॅक बनवा

पिकलेले केळं हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे करते. 1 पिकलेले केळ मॅश करा आणि त्यात थोडे नारळाचे तेल मिक्स करा. त्यानंतर ते टाचांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने पाय धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्याने तुमच्या टाचा लवकर बऱ्या होतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button