स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधींना ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील याचिकाकर्ते यांचे वकील मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली असून पुढील सुनावणी मे महिन्यामध्ये होणार असल्याचे ही ते म्हणाले. दरम्यान, न्यायालया समोर सर्वजण समान असल्याचे मत ही न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी सुनावणीला राहुल गांधी स्वत: हजर राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारत जोडे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होतं. याच वक्तव्य विरोधात सावरकर प्रेमींनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला होता. या तक्रारीवरुन राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आज(1 मार्च 2025) याबाबत कोर्टात सुनावणी झाली असता न्यायालयाने हे आदेश देत राहुल गांधींना ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी, असे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक
‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काही लोकांची मदत’; मुधोजीराजे भोसले
महापुरुषांच्या अवमान प्रकरणी फरार असलेला आरोपी प्रशांत कोरटकर इंदूरमध्ये लपला होता. त्यानंतर तो मध्यप्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये अज्ञात स्थळी लपून बसल्याचा आणि काही लोक त्याला मदत करत असल्याचा गंभीर आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे. आधीच प्रशांत कोरटकरला अटक करण्यात उशीर झालाय, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून प्रशांत कोरटकरला शोधावं आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, आज नागपुरात शिवप्रेमी कार्यकर्ते व मराठा समाजाकडून प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीचे नेतृत्व मुधोजीराजे भोसले यांनी केलं. यावेळी मुधोजीराजे यांना प्रशांत कोरटकरच्या अटकेला उशीर होत आहे का? असं प्रश्न विचारला, तेव्हा काही लोक त्याला मदत करत असून तो इंदूर आणि त्यानंतर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील लपून बसल्याचा आरोप मुधोजीराजे यांनी केला आहे.