
नाशिक : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट आहे. एकाच दिवशी शहरात सहा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकनगर येथील गायत्री स्वीटस्समोरुन रामेश्वर मुकुंददास बैरागी (रा. सम्यक चौक, सातपूर) यांची दुचाकी (एमएच. १५ जीजी ३५९०) रविवारी (ता. २३) सकाळी चोरीला गेली. दुसऱ्या घटनेत अशोकनगर भागातील राधाकृष्ण मंदिराजवळील लतिका रो-हाऊस येथून संतोष तुकाराम वड यांची दुचाकी (एमएच १५ जीवाय ८३९९) ही चोरट्यांनी चोरुन नेली. या दोन्ही घटनांबाबत सातपूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला.
आडगाव येथील साईबाबा मंदिर येथून शनिवारी (ता. १५) रात्री नऊला कैलास पिठे (रा. तपोवन) यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. आडगाव पोलिस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर रोडवरील जेहान सर्कल येथे बांधकामसाइट समोरून रविवारी (ता.२३) सायंकाळी ६ च्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी लांबविली.
हेही वाचा – गावठाण क्षेत्रांचा होणार विस्तार बावनकुळे यांची माहिती
गंगापूर पोलिस स्थानकात संजय बोडके (रा.जत्रा हॉटेल, आडगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. त्रिमूर्ती चौकातील भाजी बाजारातून १२ जानेवारी रोजी सायंकाळी चोरट्यांनी एमएच १५ जेजी ३७९० क्रमाकांची दुचाकी चोरुन नेली. याबाबत संदीपकुमार जैन (रा. खांडे मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, भारती नागेले (रा. अस्वले कॉम्प्लेक्स, सामनगाव रोड) यांची दुचाकी (एमएच १५ एफजी ३०६५) शनिवारी (ता.२२) दुपारी राहत्या इमारतीपासून चोरीला गेली. याबाबत अस्वले यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.