Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगावर युद्धाचं सावट! इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; बुधवारी युद्धविराम संपणार?

Iran vs USA war : इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. जोपर्यंत अमेरिकेकडून इराणी बंदरांची नाकाबंदी केली जाते आहे, तोपर्यंत होर्मूझची सामुद्रधुनी बंदच राहिल, असे इराणने ठामपणे सांगितले आहे. यामुळे आखाती प्रदेशातील तणाव कमी व्हायच्या ऐवजी पुन्हा वाढू लागला आहे.

अमेरिका आणि इस्रायलमधील युद्धविरामाची दोन आठवड्यांची मुदत येत्या बुधवारी (दि. २३) रोजी संपणार आहे. तर या युद्धविरामाला आता मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ट्रम्प यांनी तर पुन्हा युद्ध सुरू करम्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उर्वरित मुदतीतच स्थायी युद्धबंदीचा करार घडवून आणण्यासाठी मध्यस्थांची गडबड होऊ लागली आहे.

एक दिवसापूर्वी इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पुर्णपणे खुली केल्याचे जाहीर केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलासा व्यक्त होऊ लागला होता. मात्र नंतर दुसऱ्याच दिवशी इराणने हा मार्ग पुन्हा बंद केला. या काळात दोन बोटींनी होर्मूझ ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण रिव्होल्युशनरी गार्डच्या गोळीबारामुळे या जहाजांना माघारी परतावे लागले होते.

आम्ही होर्मूझमधून कोणत्याही जहाजाला जा देऊ शकत नाही. अमेरिकेची नाकाबंदी सुरू असेपर्यंत होर्मूझ देखील बंद असणार आहे. होर्मूझमध्ये इराणने लावलेले पाणसुरूंग हटवण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला, तर युद्धविराम अपयशी होणार, हे निश्‍चित आहे, असे इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेई कालिबाफ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –  कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागामध्ये इस्रायलने जोरदार हल्ले केले आहेत. त्यात हिज्बुल्लाहचे किमान १५० सदस्य मारले असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. ठार झालेल्या हिज्बुल्लाहच्या सदस्यांमध्ये अली रिदा अब्बास नावाच्या हिज्बुल्लाहच्या बिंट बेल गटाच्या कमांडरचाही समावेश आहे.

लेबनॉन आणि इस्रायलमध्ये युद्धविराम लागू होण्यापुर्वी लेबनॉनच्या दक्षिणेकडील शहरे आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये इस्रायली सैन्य आणि हिज्बुल्लाहच्या सशस्त्र गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू होता. हिज्बुल्लाहचा कमांडर मारल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ इस्रायलने कोणताही पुरावा दिला नाही.

तसेच आपला कमांडर ठार झाल्याच्या वृत्ताचे समर्थऩ अथवा खंडन करण्यासाठी हिज्बुल्लाहकडूनही कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. शुक्रवारी सकाळपासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या युद्धविरामाला प्रारंभ झाला आहे.

अशाप्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, यासाठी इराणला कायमस्वरुपी शांततेची अपेक्षा आहे, असे इराणच्या संसदेचे सभापती कालिबाफ यांनी टिव्हीवरच्या एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

इराण आणि अमेरिकेदरम्यानचा दोन आठवड्यांचा युद्धविराम संपण्याला काही दिवस शिल्लक असताना त्यांनी ही अपेक्षा बोलून दाखवली आहे.अमेरिकेचा अविश्‍वास ही आमच्यासाठी सर्वात मूलभूत गोष्ट आहे. इस्लामाबादमधील चर्चेदरम्यान या अविश्‍वासाबद्दल काहीच बोलणे झाले नाही.

त्याच वेळी आम्हाला पुन्हा युद्ध न होण्यासाठी आवश्‍यक असलेली स्थायी शांतता हवी आहे. ही एक चांगली इच्छा आहे, असेही ते म्हणाले. इस्लामाबादमधील चर्चेत सकारात्मक प्रगती होती, पण तरी होर्मूझ आणि आण्विक प्रकल्पांबाबत मतभेदही कायम राहिल्याचे त्यांनी मान्य केले.

लेबनॉन सरकारने दक्षिणेकडील नाबातिये आणि मारजायोन या शहरांना जोडणारा खारदाली रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. टायर बंदर आणि बुर्ज रहाल या गावाला जोडणारा रस्ताही खुला करण्यात आला आहे, असे लेबनॉनच्या सैन्याने म्हटले आहे.

टायर फिलसे गावातील लितानी नदीवरील पूलासह अन्य रस्तेही खुले करण्याचे काम केले जाते आहेत. गेल्या काही आठवड्यात इस्रायलने या भागातील प्रमुख पूल उद्ध्वस्त केले आहेत. दक्षिणेकडे परतणाऱ्या लोकांसाठी या पुलांच्या जागेवर तात्पुरते पूल उभारण्याचे काम लेबनॉनचे सैन्य आणि लितानी प्राधिकरणाकडून केले जाते आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button