TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

आयुक्तांच्या फर्मानानंतर कर्मचारी ‘वठणीवर’; कामकाज पूर्वपदावर!

जुनी पेन्शन योजना आंदोलन : महापालिकेतील वर्दळ पुन्हा वाढली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानंतर आज महापालिकेतील कर्मचारी तात्काळ कामावर रुजू झाले आहेत. कामावर रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरु असलेला संप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांनी मागे घेतला आहे. पण कामगारांनी काळ्या फिती लावून आज सकाळपासून कामकाज सुरु केले आहे.
आज पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिका गजबजलेली पहायला मिळाली.

जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातुन 18 लाख कर्मचारी संपावर गेले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केला. काल मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता.पिंपरी चिंचवड महापालिकेत शुकशुकाट होता. दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे सर्व कामकाज बंद झाले होते. दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यानुसार पेन्शन लागू असलेले कर्मचारी आज सकाळी कामावर रुजू झाले. त्यानंतर 2005 नंतरचे कर्मचारीही कामावर हजर झाले. त्यामुळे महापालिकेतिल कामकाज पुर्व पदावर सुरु झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button