Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

२०२७ पासून ‘NEET’ परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

NEET Exam 2027 Online | वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशभरात घेतली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा आता कात टाकणार आहे. आगामी २०२७ पासून ही परीक्षा पूर्णपणे ‘ऑनलाइन’ म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केली. २०२६ च्या परीक्षेत झालेल्या मोठ्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

चालू वर्षात ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि विविध गैरप्रकार समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. लाखो विद्यार्थी आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. पारंपरिक ऑफलाइन (पेन आणि पेपर) पद्धतीमध्ये होणारी पेपरफुटी आणि परीक्षा केंद्रांवरील इतर गैरव्यवहार कायमचे थांबवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

YCM : ‘वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, २०२७ पासून नीट परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडेल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि मानवी हस्तक्षेप कमी होऊन गैरप्रकारांना चाप बसेल.

दरम्यान, यंदा रद्द करण्यात आलेली २०२६ ची नीट फेरपरीक्षा येत्या २१ जून रोजी होणार असून, यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त फी भरावी लागणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे भविष्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षांची सुरक्षा अधिक भक्कम होईल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button