एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल
शिक्षण विश्व : १२ वी सीबीएसई बोर्डमध्ये मारली बाजी

पिंपरी- चिंचवड | सीबीएसई बोर्ड इयत्ता १२ वी चा विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे एकूण ४१ विद्यार्थी उत्तम गुण मिळवून पास झाले आहेत.
विज्ञान शाखेत दीपांशु सरकार याने ९२.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. काश्वी तन्वर हिने ९१.४ टक्के द्वितीय क्रमांक आणि एस. अनंताश्री ९१.२ टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे. चौथा क्रमांक उदय निंबोरकर ९०.८ टक्के आणि पाचवा क्रमांक सुजल कापसे ८९.२ टक्के या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. वाणिज्य शाखेत वैभव ओझा याने ९२.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ गोयल याला ८८.८ टक्के द्वितीय क्रमांक आणि ख़ुशी बार्गी ८७.४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
हेही वाचा
तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात भाव्या अंगोजी आणि खुशी बार्गी यांना १०० गुण मिळाले आहेत. तसेच इंग्रजी मध्ये कुणाल तहसीलदार ९७ गुण, गणित विषयात काश्वी तन्वर हिला ९६ गुण, भौतिक शास्त्र मध्ये दीपांशु सरकार याला भौतिक शास्त्र ९३ आणि रसायन शास्त्र मध्ये ९१ गुण, भाव्या अंगोजी हिला जीवशास्त्र मध्ये ८८ गुण, पार्थ गोयल याला अर्थशास्त्र मध्ये ९३, वैभव ओझा याला व्यावसायिक शिक्षण ९५ आणि लेखाशास्त्र मध्ये ९९ गुण मिळाले आहेत. तर म्हाळसा पराते आणि उदय निंबोरकर यांना शारीरिक शिक्षण विषयात प्रत्येकी ९६ गुण मिळाले आहेत. तसेच माहिती शास्त्र पद्धती मध्ये भाव्या ओन्गोळे हिने ९८ गुण मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन…
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील व्यावसायिक गरज ओळखून विविध शालेय उपक्रमांचे आयोजन केले होते त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने अभिनंदन केले.





