‘मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय’; उदय सामंत

Uday Samant : मराठी फिल्म इंडस्ट्रीची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. ही मागणी आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केली असल्याचे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. आजपासून म्हणजे 1 मे पासून महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे सामंत म्हणाले. हा निर्णय घेत असताना आम्हाला काही गाईडलाईन्स आल्या होत्या. एवढे चित्रपट आणि एवढेच निर्माते त्यामध्ये बसवले पाहिजे असे सामंत म्हणाले.
याबाबतची फाईल माझ्याकडे आली आणि मी निर्णय घेऊन टाकला. हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीला सुद्धा इंडस्ट्रीचा दर्जा दिला पाहिजे. त्यामुळं मराठी फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे सामंत म्हणाले. आजचा कार्यक्रम जो मुंबईमध्ये झाला तो जागतिक दर्जाचा कार्यक्रम होता. उद्योग विभागासोबत मराठी भाषेचे खाते सुद्धा माझ्याकडे आहे. महाराष्ट्राचा अमृत कलश ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी भाषेच्या विभागाची सुद्धा निर्मिती केली आहे. मराठी साहित्याचा अनुवाद प्रत्येक भाषेत झाला पाहिजे आणि म्हणून अनुवाद अकादमी त्यांनी स्थापन केली. दुर्दैवाने ती का बंद पडली? यावर मी बोलणार नाही असे सामंत म्हणाले.
हेही वाचा – मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखड्यात पिंपरी महापालिकेने पटकाविले दुसरे स्थान
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनुवाद अकादमी सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मराठी साहित्य त्यासोबत मराठी स्क्रिप्ट हिंदी स्क्रिप्ट वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करु शकतो. एक रुपयाचा खर्च लेखकाला अनुवाद करताना येणार नाही.
महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. त्यामुळे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भात सातत्यानं मागणी केली जात होती. मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती या क्षेत्रासदेखील मिळतील. चित्रपट/ करमणूक उद्योगाची व्याप्ती मोठी आहे. मनोरंजन वाहिन्या, डिजिटल मीडिया, लाइव्ह इव्हेंट, ॲनिमेशन, आऊट ऑफ होम मीडिया, सिनेमा, रेडिओ यांच्यासह अनेक बाबींचा यात मध्ये मावेश होतो. चित्रपट (शॉर्ट फिल्मस/ ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे) आणि मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे