किसान अॅग्रो सेंटरला महाराष्ट्र दिनी विद्युत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
कीटकनाशके आणि शेतीसाहित्य जळून खाक

लोहगाव : पैठण तालुक्यातील लोहगाव ते ढोरकीन राज्य मार्गावरील मुलांनी वाडगाव फाटा येथे महाराष्ट्र दिनी भर दुपारी रखरखत्या कडक उन्हाच्या पहा-यात किसान अॅग्रो सेन्टर दुकानात वीज शाॅटसक्रीट झाल्याने भीषण आग लागून दुकानातील जवळपास दहा ते बारा लाख रूपयाचे शेकडो लिटर द्रव रूपातील पीकावर फवारणीचे अन्नद्रव्ये,किटकनाशक, तणनाशकाने भरलेल्या प्लास्टिक कॅन, बाॅटल, जळून खाक झाल्याची घटना दुपारी तीन वाजेनंतर घडली आहे.
कृषी सेन्टर चालक साजेंद अब्दुल रहेमान सय्यद हे दुपारी जेवण करण्याची दुकान बंद करून घरी गेला असताना तीन वाजेनंतर अचानक कृषी सेवा दुकानात वीज शाॅटसक्रीट होऊन आग लागली. त्यात प्रचंड तापमाना असल्याने पीक फवारणीसाठी असलेल्या द्रवरूपातील किटकनाशक तणनाशक सुक्ष्म अन्नद्रव्ये खत औषधांच्या प्लास्टिक कॅन बाॅटल पघळल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती.
हेही वाचा – तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी
आजूबाजूच्या व्यापारी, नागरिकांच्या निदर्शनास हि घटना येताच आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले.शेजारी विंधन विहिरीचे पंपांचे पाण्याने आग आटोक्यात आणण्यासाठी धावा धाव केली पण आधिच वाढलेले तापमान त्यात आगीचे लोळामुळे जवळून पाणी मारण्यास अडचणी निर्माण होत होत्या.अनेकानी यासाठी मदत केली पण प्रचंड आगीपुढे सर्व जळून खाक झाले.यात जवळपास दहा ते बारा लाखा रूपयांचे विविध प्रकारचे औषधी, आदी साहित्याचे नुकसान झाल्याचे दुकान चालक साजेंद सय्यद यांनी सांगितले आहे.