Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळीये दुर्घटनेतील मृतांची संख्या ८५ वर ; जखमी महिलेचा मृत्यू

कोकण |

अलिबाग – महाड तालुक्यातील तळीये येथील दरड दुर्घटनेतील जखमी महिलेचा गुरुवारी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगीता कोंडाळकर असे या मृत महिलेचे नाव आहे. जखमी संगीता कोंडाळकर यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला होता, आता मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे.

तर, महाडमधील तळीये गावात कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेला वेग देण्यात आला आहे. सध्या दोन एकर जागेवर त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येत आहे. तर ६० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागणार असून यासाठी कोंढारकरवाडीतील १२ एकर जागा निश्चिात करण्यात आली आहे. या जागेच्या संपादनासाठीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. दुसरीकडे म्हाडानेही ‘प्री फॅब’ पद्धतीच्या घरांचे दोन नमूने तयार करून घेण्यास सुरुवात केली असून आठवड्याभरात हे नमूने म्हाडा मुख्यालयात पहायला मिळणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button