Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

नगरसेवक रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सन्मान

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महापालिकेचे बिनविरोध नगरसेवक रवी बाबासाहेब लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला. भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान यांच्या वतीने, संतोष लांडगे, मंगेश आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भोसरी रुग्णालयात कोविड योद्धयांचा सन्मान भेटवस्तू तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला करण्यात आला. यावेळी राहुल अंकुशराव लांडगे तसेच कै अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.ढगे, डॉ. म्हस्के, सर्व परिचारिका, बीव्हीजीचे सर्व स्वछता कर्मचारी, सुरक्षा रक्षक असे एकूण १५० कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी करताना, रुग्णालयाला खाजगी कंपनी मार्फत CSR फंडातून अद्ययावत बोन टेस्ट मशीन, X Ray मशीन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले आहेत. लवकरात लवकर आता रुग्णालयात ICU वार्ड सुरू होईल अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button