Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, पुण्यातही जोरदार…राज्यभरात हाय अलर्ट

कोल्हापूर : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून, कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात आज ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस कोसळला. पुणे शहरासह जिल्ह्यातही जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यभरात पुढील दोन दिवसांसाठी तीव्र पावसाचा इशारा जारी केला आहे. तळकोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित भागांसाठी यलो अलर्ट आहे. पुढील तीन दिवसांत (१२ ते १५ जून) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग ताशी ५०-६० किमी राहील, सोबत मेघगर्जना आणि वीज पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – विमान अपघातावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; बोईंग ड्रीमलायनर विमानांबाबत दिली महत्त्वाची माहिती

मान्सूनचा विस्तार

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, नैऋत्य मान्सूनने मुंबई आणि अहमदनगरसह राज्याचा मोठा भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासांत विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाकडे मान्सून सरकणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कोकण, मराठवाडा आणि कर्नाटकात पावसाचा जोर वाढेल. १२ ते १७ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र पाऊस, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सतर्कतेचे आवाहन

पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि रत्नागिरीत रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे नागरिकांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button