Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई | मुंबई शहरात २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना जीवाची बाजी लावत मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शाहिद झाले. अशा वीरमरण आलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. तसेच मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य, उद्योजकता व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला, मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

हेही वाचा     :          मुंबई वेगळी करण्याचा डाव? राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त केली. या अभिवादन कार्यक्रमाचे परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक रमेश लोखंडे यांनी संचलन केले. तसेच बँड पथकाचे पोलीस निरीक्षक संजय कल्याणे यांनी नेतृत्व केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक राजेश खुपकर यांनी केले. कार्यक्रमाला शहिदांचे कुटुंबीय, गृह विभागाचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button