टी-२० वर्ल्डकप २०२६ वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला

T20 World Cup 2026 | आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल अखेर वाजला आहे. बीसीसीआयच्या यजमानपदाखाली भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या या भव्य स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ दरम्यान रंगणार असून वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
२० संघ, ४ गट – रोमांचक फॉरमॅट
या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी आहेत. प्रत्येक गटात ५ संघ असून, प्रत्येक गटातून पहिले २ संघ सुपर-८ मध्ये प्रवेश करतील. सुपर-८ मधून ४ संघ सेमीफायनल गाठतील आणि अखेर दोन संघ ८ मार्च रोजी अंतिम लढत खेळतील.
अ गट – भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया.
ब गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान.
क गट – इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली.
ड गट – न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई.
हेही वाचा : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
भारतीय संघाचे सामने
७ फेब्रुवारी – भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
१२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
१५ फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
१८ फेब्रुवारी, भारत विरुद्ध नेदरलँड, अहमदाबाद
या स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक गटात ५ संघ आहेत. या ५ पैकी प्रत्येक गटातून २ संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. या ८ पैकी ४ संघ सेमीफायनलचा सामना खेळतील आणि सेमी फायनल जिंकणारे संघ जेतेपदासाठी अंतिम सामना खेळतील.




