Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांद्याच्या पिकात गांजा लागवड उघड; गुगुळपिंपरीतून ८० झाडे जप्त!

तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांची कारवाई; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी शिवारात कांद्याच्या पिकामध्ये लपवून लावलेली गांजाची झाडे गोरेगाव पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. तब्बल तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना एका शेतात गांजाची ८० झाडे आढळून आली असून त्यांची किंमत सुमारे ८५ ते ९०हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांची पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

हेही वाचा – विमान प्रवाशांना मोठा दिलासा; ६०% सीट सिलेक्शन आता मोफत..!

या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. याच दरम्यान सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी शिवारात एका शेतात कांद्याच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितीन लेनगुळे, जमादार अनिल भारती, पोलिस कर्मचारी राहुल मैंदकर व नवले यांच्या पथकाने सोमवारी दुपारपासून शोध मोहीम सुरू केली. सुमारे तीन तास गुगुळपिंपरी परिसरात शोध घेतल्यानंतर विठ्ठल ढोक (रा. माहेरखेडा) यांच्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावलेली आढळून आली.

काही झाडे तीन ते चार फूट तर काही दोन फूट उंचीची वाढलेली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ८० झाडे जप्त केली असून त्यांचे वजन सुमारे साडेआठ किलो आहे. या झाडांची किंमत अंदाजे ८५ ते ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक नितीन लेनगुळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात विठ्ठल ढोक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके आणि उपनिरीक्षक लेनगुळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button