रोहित-हार्दिक OUT…?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम

Ind vs Afg ODI Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 जून रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनौ येथील एकाना स्टेडियमवर होईल. अखेरीस, मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काल (19 मे) अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला. 15 सदस्यीय भारतीय संघात शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरवर उपकर्णधारपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – केळी इतकेच त्याच्या पानांचेही महत्त्व… ‘हे’ आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या तंदुरुस्तीबाबत (फिटनेसबाबत) प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीसीसीआयने हार्दिक आणि रोहित या दोघांनाही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) येथे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही खेळाडूंना आपली तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा आगामी एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्यास पात्र ठरतील.
एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ-
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.





