Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
Pimpri : नेहरूनगर मधील मेडिकल दुकानाला आग, सुदैवाने जीवित हानी नाही

पिंपरी : पिंपरी मधील नेहरूनगरमध्ये एका मेडिकल दुकानाला आग लागली आहे. ही घटना काल (२६ जुलै) रात्री आकराच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच एक बंब घटनास्थळी दाखल झाला. एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर मधील एका मेडिकल दुकानाला आग लागली. रात्री आकराच्या सुमारास या दुकानाला आग लागली. यानंतर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
हेही वाचा – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक
अग्निशमन जवानांनी एका तासाच या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.





