नागपूर हिंसाचार प्रकरण : फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा

नागपूर | नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून या दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायबर पोलिसांनी केली सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात फहीम खान व त्याच्या साथीदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरातील दंगल भडकविणारा मास्टरमाईंडला फहीम खान याला पोलिसांनी अटक केली असून त्यानेच सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करुन गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. पोलिसांनी ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याचा समावेश होता. या प्रकरणात सध्या २०० पेक्षा जास्त दंगलखोरांची नावे पोलिसांनी समोर आणली आहेत.
हेही वाचा : ‘दिशाच्या कुटुंबावर दबाव असल्याचं वाटतंय’; संजय राऊतांचं वक्तव्य
दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत असलेल्या जवळपास तीनशेवर सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली. यामध्ये १७२ अकाउंट वर आक्षपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ आढळून आले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या ४० टक्के व्हिडिओ आणि फोटो सायबर पोलिसांनी डिलीट केले आहेत. सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्य मजकूर किंवा व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, नागपूर सायबर क्राईम.