Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सांगली बंद’मागे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळेंचे भाजपावर टीकास्त्र

मुंबुई | महाईन्यूज

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (17 जानेवारी) सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केलेले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर असणार आहेत.

सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे मला वाटते. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच, सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी केला. यावेळी माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button