Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉक्टर, परिचारिकांचे दुर्लक्ष; गर्भवती खाटेवरच प्रसूत

पिंपरी : डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे निगडी येथील महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात वॉर्डातल्या खाटेवरच गर्भवती प्रसूत झाली. तब्बल चार तास असह्य वेदनांनी गर्भवती विव्हळत होती. मात्र, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच परिचारिका यांना साधा माणुसकीचाच नव्हे; तर त्यांच्या कर्तव्य भावनेलाही पाझर फुटला नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गंभीर प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना त्याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझी वहिनी हिना खैरनार यांना यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात सकाळी अकरा वाजता प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते.

यावेळी वहिनीसोबत माझी आई अन्नपूर्णा खैरनार या उपस्थित होत्या. प्रसतीगृहातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हिना खैरनार यांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना वॉर्डातील खाट देण्यात आली. दुपारी चार वाजेनंतर हिना यांना प्रसुती वेदना होऊ लागल्या. परंतु, रुग्णालयातील कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

हेही वाचा –  Relief to society holders: डुडूळगाव येथील सोसायटीचा ड्रेनेज प्रश्न निकालात

तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ होऊन देखील त्रास न थांबल्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दीपक यांच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर महेश दणाणे यांना सांगितले. मात्र, त्यांनी अजून दोन तास तरी प्रसुतीला लागतील, असे सांगितले. तुम्ही तुमच्या खाटेवर जाऊन बसा, असे आईला सांगितले. यावेळी वॉर्डात सुप्रिया गायकवाड, प्रियांका साळवे व राजकन्या वानखेडे या परिचारिका उपस्थित होत्या.

यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास असह्य वेदनांनी विव्हळत हिना या वॉर्डातल्या बेडवरच प्रसूत झाल्या. सुदैवाने माता आणि नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला नाही. दरम्यान, या प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना संपर्क साधत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

यमुनानगर रुग्णालयात सायंकाळी प्रशासनाचा कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने गर्भवतींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर तसेच परिचारिकांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गर्भवतींच्या जिवावर बेतले आहे. कंत्राटी कर्मचारी वर्गावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णसेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालय ‘सलाईन’वर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button