Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंची आज होणार ईडीकडून चौकशी
मुंबई |
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी 30 डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलेलं होतं. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकलेले नव्हते. मात्र त्यांचा क्वारंटाईन काळ आता संपला असल्याने ते आज ईडी कार्यालयात चौकशीकरता जातील.




