Breaking-newsमहाराष्ट्र

महाबळेश्वरमध्ये २४ तासांत १८१ मि.मी. पाऊस

  • पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम

वाई – महाबळेश्वरमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. आज शुक्रवारीही महाबळेश्वर शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू होती. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ  या २४ तासात येथे सुमारे १८१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर १ जून पासून ही आकडेवारी सुमारे ५५३ मिमी एवढी झाली आहे. दरम्यान हा पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू असल्याने सलग पडलेल्या पावसाची ही आकडेवारी अजून वाढणार आहे.

महाबळेश्वरमध्ये कालपासून पावसाने जोर पकडला आहे. गुरुवारी सकाळीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार आज शुक्रवारीही दिवसभर सुरू होती. सततच्या पावसाने डोंगररानी सर्वत्र पाण्याचे लोट खळाळू लागले आहेत. महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवरही या पाण्याचे डोह अनेक ठिकाणी तयार झालेले आहेत. दरम्यान या हंगामातील या पहिल्याच पावसाने जनजीवन काहीसे विस्कळित झाले. सततच्या पावसाने सखल भागात पाणी मोठय़ा प्रमाणात साठले होते. शहरात काही ठिकाणी या साठलेल्या पाण्याचा दाब वाढल्याने सुरक्षाभिंती कोसळण्याच्याही काही घटना आज महाबळेश्वरमध्ये घडल्या.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button