Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या पीए विरोधात खदखद, रस्तारोको आंदोलन करुन उमेदवार बदलाची मागणी

लातूर – विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान लातूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण लढतीपैंकी एक असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत खदखद रस्त्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यानंतर लगेचच पक्षांतर्गत बंडाळी उघड झाली आहे.

बंडाचा झेंडा फडकावणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हेदेखील सहभागी झाले होते. भूमीपुत्राचा मुद्दा घेऊन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर, शिवसेना माजी आमदार दिनकर माने, जिल्हा परिषद सभापती बजरंग जाधव, स्थानिक भाजप नेते किरण उटगे यांच्यासहित भाजपचे अनेक कार्यकर्ते औसा शहरात रस्त्यावर उतरले होते. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर आक्रमक झालेल्या भाजप-सेना कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा ताफाही औसा टी पॉईंट येथे अडविला. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांना निवेदन देऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button