breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

महादेव जानकरांचा फोटो बॅनरवरून गायब, रासपचा एकमेव आमदार भाजपच्या वाटेवर?

परभणी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शहरामध्ये लावलेल्या बॅनरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. गुट्टे यांच्या बॅनरवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर गायब झाले आहेत. त्यामुळे गंगाखेड शहरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. बॅनरवर फोटो न टाकण्याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नागरिक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. रत्नाकर गुट्टे हे भाजपच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांसह अपक्ष आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे ठाकरे सरकार कोसळले. १० अपक्ष आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. अशा राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता आमदार रत्नाकर गुट्टे हे चर्चेत आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड शहरामध्ये आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांगांना साहित्य वाटप सोहळा आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी १५ सप्टेंबरला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने गंगाखेड शहरामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र ते ज्या राष्ट्रीय समाज पक्षातून निवडून विधानसभेवर गेले आहेत. त्याच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील एकमेव रासपाच्या आमदारांना पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष यांचा विसर पडला की काय? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे गंगाखेड शहरामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button