breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप पदाधिका-यांकडून घोषणांचा पाऊस; दीड महिना उलटूनही तीन हजारांची मदत मिळेना !

  • लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर कधी निघणार?
  • निवडणूकांच्या तोंडावर भाजपकडून केवळ घोषणा, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप पदाधिका-यांकडून महासभेत अथवा स्थायी समितीत ठराव करुन नूसता घोषणांचा पाऊस सुरु आहे. आर्थिक दुर्बल घटकातील हातावरील पोट असणा-या हातगाडीवाले, पथारीवाले, रिक्षाचालक, मोलकरीण आदींना लाॅकडाऊन काळात तीन हजार रुपये देण्याचा ठराव करुन तब्बल दीड महिना उलटला. प्रत्यक्षात कष्टकरी, गोरगरीबाना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे भाजप पदाधिका-यांनी केवळ घोषणा करायची अन्ं नेत्यांचे फोटो लावून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जाहिराती फिरवण्याचा उद्योग सुरु केला आहे. यामुळे ख-या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांची दिशाभूल होवू लागली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने शासनाने कडक निर्बंध लादले. त्यानंतर हातावर पोट असणा-या कष्टकरी जनतेसाठी दीड हजार रुपयाची घोषणा केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना तीन हजार रुपयाची मदत जाहीर केली. तसेच राज्यात भाजप सत्तेत असलेल्या महापालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच मदत देत असल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल केल्या. प्रत्यक्षात महानगरपालिका अधिनियमांचा अभ्यास न करता भाजपने तत्काळ घोषणा केली. परंतू, लॉकडाऊन संपत आला तरी गोरगरीब, कष्टकरी, मोलकरीण, रिक्षाचालकांना कसलीही दमडीची मदत मिळालेली नाही.

महापालिकेच्या नागरवस्ती विभागात विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यातून नागरिकांना थेट लाभाच्या योजनेसाठी तरतूद आहेत. राज्य शासनाने घोषणा केली म्हणून पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी कोणतेही पुर्व नियोजन न करता, कायदेशीर अभ्यास न करता. थेट मदतीची योजना केल्याने सर्वजण मदत मिळेल या अपेक्षा व्याकूळ झाले आहेत.  शहरातील रिक्षाचालक, परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर यासह बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे, भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नंदीवाले, गोंधळी, भराडी, बँडवाले, वाजंत्री अशा विविध घटकातील गोरगरीबाना कधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

———-

संभाव्य कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना वाचविण्यासाठी महापालिकेच्या निधीतून उत्पादित कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस ग्लोबल टेंडर पध्दतीने थेट खरेदी करण्याची घोषणा झाली. शहरात वाढणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या निधीतून लस उत्पादित कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस थेट खरेदी करण्यासंदर्भात स्थायी समितीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी तात्काळ ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबवून लस खरेदी करण्यात येईल, असंही महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. परंतू, यावर अजून विचारविनिमय सुरु आहे. प्रत्यक्षात ग्लोबल टेंडर काढण्याची कसलीही तयार पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना लस कधी मिळणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

———–

प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून २ हजारांची रक्कम देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेना घेतला. प्लाझ्माचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. बाहेरील रुग्णांना प्लाझ्मा मोफत देण्यात येईल, असंही सांगण्यात आले. शहरातील शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत. म्हणून प्लाझ्मा दान करणारे पुढे यावेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी त्यांना प्रोत्साहनपर २ हजार रुपये महापालिकेकडून आणि महापाैरांकडून एक हजार रुपये, असे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात किती प्लाझ्मा दान करणा-यांना हे बक्षीस दिले. याबाबत प्रशासनाकडे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button