breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगरची स्वच्छतेकडे वाटचाल!; प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी : प्रतिनिधी
इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक एक व दोन येथे मैदानाची दुरवस्था, वाढलेले गवत, झाडेझुडपे आणि राडारोडा यामुळे परिसरात डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यातच पावसाचे वातावरण असल्याने जमीन ओलसर राहत असून परिसरात दुर्गंधी पसरली होती. आशा एक ना अनेक अडचणींचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागत होता. याबाबत भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून संबंधित विभागाकडून कार्यवाहीला सुरवात झाली असून प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आले.

इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक एक व दोन येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. दरम्यान तेथील सार्वजनिक भूखंडावर जागोजागी गवत व झाडेझुडपे वाढले असून पदपथ मोडकळीस आले आहेत. गवताच्या मध्यभागी साचणाऱ्या पाण्यात डेंगीचे डास वाढण्याची शक्यता आहे. गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य वाढले असून नागरिकांसाठी धोकादायक आहे. परिसरात डास व रोगजंतूंच्या संख्येत वाढ झाली असून पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच, या परिस्थितीमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. याबात परिसरातील नागरिकांनी शिवराज लांडगे यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार लांडगे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून याठिकाणी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली होती. दरम्यान याबाबत पालिकेने लेखी स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देत याठिकाणी पाहणी केली. तसेच संबंधित विभागाला याबाबत तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच याठिकाणी स्वछता मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. यामुळे लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इंद्रयणीनगर परिसराची स्वच्छतेकडे वाटचाल सुरु असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button