breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली; अंकुश शिंदे नवे पोलिस आयुक्त

पिंपरी : राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्ण प्रकाश यांची पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड येथून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button