breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

गुंगीचे औषध देऊन पॉर्न व्हिडिओ बनवला! मिस इंडिया युनिव्हर्सचा दावा

मुंबई – पॉर्न फिल्ममुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत सापडला असतानाच झारखंडच्या मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवानने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन मुंबईतील एका प्रोडक्शन कंपनीने आपल्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ तयार केला, असा गंभीर आरोप तिने केला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली आहे.

झारखंडमधील गुमलाची मॉडेल परी हिने २०१९ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने कतराजमधील नीरजसोबत लग्न केले होते. मात्र पती आणि सासरची मंडळी हुंड्यासाठी छळत असल्याची तक्रार तिने केली होती. या प्रकरणात तिचा पती आणि सासरच्या मंडळींना अटक झाली होती. नंतर परी पासवान कामाच्या शोधात मुंबईला आली. त्यावेळी एका ठिकाणी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून माझा अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आला. मला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा मी मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस याचा तपास करत आहेत, असे परीने म्हटले आहे. दरम्यान, तिचा पती नीरज पासवान याच्या कुटुंबीयांनी परी अश्लील फिल्ममध्ये काम करत असल्याचा आणि निष्पाप तरुणांना फसवत असल्याचा आरोप केला आहे. तिने यापूर्वी २ जणांशी लग्न केले असून त्यांची आयुष्य उध्वस्त केली असल्याचा आरोप नीरजचा भाऊ चंदनने केला आहे. मात्र अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे मुंबईतील चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button