breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची लागण
राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.