breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाचा आणखी एक नवा C.1.2 प्रकार आढळला

मुंबई – कोरोनाने अवघ्या जगाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अवघे जग या विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील असताना आता दक्षिण आफ्रिकेसह इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचे आणखी एक धोकादायक रूप समोर आले आहे. कोरोनाचा C.1.2 हा नवा प्रकार मे महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. तेव्हापासून १३ ऑगस्टपर्यंत तो चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वीत्झर्लंडमध्येही आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली.

दक्षिण आफ्रिकेत पहिल्या लाटेदरम्यान आढळून आलेल्या कोरोनाच्या C.1 प्रकाराच्या तुलनेत C.1.2 या नव्या प्रकारात मोठे बदल आढळले आहेत. त्यामुळे या प्रकाराला चिंताजनक विषाणूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य असू शकतो आणि कोरोनावरील लसीपासून मिळणारे सुरक्षा कवचही भेदू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. सीएसआयआर, कोलकाताचे वैज्ञानिक राय म्हणाले, ‘त्याचा प्रसार जास्त असू शकतो आणि तो वेगाने पसरण्याची शक्यता आहे. वाढलेल्या प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन असतात. ज्यामुळे हा रोग प्रतिकारशक्तीच्या नियंत्रणात राहत नाही. जर तो पसरला तर जगभरातील लसीकरणासाठी हे एक आव्हान बनेल.’

दरम्यान, सध्या कोरोनाच्या डेल्टा विषाणूमुळे रोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यातच आगामी काळात कोरोनाचे आणखी नवे प्रकार समोर येतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिला आहे. तसेच जगातून ही महामारी लवकर संपणारी नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या C.1.2 या नवीन प्रकाराने चिंता वाढवली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button