breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहले मंदिर फिर सरकार! शिवसेना खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन

नवी दिल्ली –  राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक झाली असून बुधवारी संसदेबाहेर शिवसेना खासदारांनी राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, अशा घोषणा देत शिवसेना खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राम मंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली आहे. तर संसदेबाहेर बुधवारी सकाळी शिवसेना खासदारांनी महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ घोषणा दिल्या. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, असे पत्रक हातात घेऊन शिवसेना खासदारांनी घोषणा दिल्या.

दरम्यान, स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेने २०१८ च्या आरंभी जाहीर केला होता. गेल्या दोन महिन्यांत राम मंदिर, हिंदुत्व या मुद्द्यांवर शिवसेना आक्रमक झाली आहे. राम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येतही जाऊन आले. या दौऱ्याची चर्चा देशभरात झाली होती. आता राम मंदिराचा मुद्दा संसदेत मांडून शिवसेनेने भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिवसेना आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button