breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: विमान सेवा बंद झाल्याने विमान वाहतूक कंपन्यांची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात…
विमान सेवा बंद झाल्याने विमान वाहतूक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. इंडिगो कंपनीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन २५ टक्क्य़ांनी कमी केले आहे, तर ‘विस्तारा’ने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना तीन दिवस सक्तीची विनावेतन रजा दिली आहे.
स्पाइसजेटने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन १० ते ३० टक्के कमी करण्यात येत आहे. एअर इंडियाने कर्मचाऱ्यांचे भत्ते तीन महिन्यांसाठी दहा टक्क्य़ांनी कमी केले असून यात केबिन कर्मचाऱ्यांचे भत्ते मात्र कापले जाणार नाहीत. गोएअरने कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले असून काही वैमानिक व कर्मचाऱ्यांना विनावेतन रजा दिली आहे, अर्थात त्यात रोटेशन पद्धत लावली आहे.