breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: प्रवासी हवाई वाहतूक ३ मेपर्यंत बंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवल्यानंतर आता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानेही ३ मे पर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान सेवा याआधी २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात बंद ठेवण्यात आली होती. हवाई वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे, की आता यापुढेही ३ मे रोजी रात्री ११.५९ पर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद राहील. हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले, की ३ मेपर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आली त्याला पुरेशी कारणे आहेत. ३ मे नंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरची बंदी उठवण्याचा विचार करण्यात येईल. ज्या लोकांना प्रवाशाची गरज आहे त्यांची निकड आम्ही समजू शकतो पण त्यांना काही काळ गैरसोय सहन करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button