breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सैफ अली खान आणि करीना कपूर खाननं दिली अजून एक ‘GOOD NEWS’

सैफ अली खान आणि करीना कपूर खान या सेलेब्रिटी जोडीने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा एक गुड न्यूज दिली आहे. मीडियाचं प्रचंड आकर्षण मिळत असलेल्या तैमूर अली खाननंतर आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करीनाने जाहीर केलं आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये करिना पुन्हा आई होणार असल्याची चर्चा सुरू होती. सैफ आणि करीनाने आता नव्या पाहुण्याच्या आगमानाची चाहूल असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर काही दिवस करिनाने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचं धडाक्यात पुनरागमनही झालं. आपण पुन्हा एकदा तिने आई व्हायचा निर्णय घेऊ शकतो, असं ती काही मुलाखतींमधून सांगत होती. आता सैफ आणि करीनाने दुसऱ्यांदा ती गोड बातमी शेअर केली आहे.

आमच्या कुटुंबात नवा पाहुणा येणार आहे, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार, असा संदेश सैफ आणि करीनाने जाहीर केलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button