breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

#Lockdown | मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार ?

नवी दिल्ली | करोना व्हायरस आणि देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी
चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेल्या या चर्चेत पंतप्रधानांनी सर्व परिस्थितीचा आढावा. यानंतर पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतील, असं बोललं जात होतं. पण पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button