breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Lockdown: गावाकडं निघालेल्या १४ मजुरांचा अपघाती मृत्यू; पायी जाणाऱ्यांना बसनं चिरडलं

लॉकडाउनच्या काळात पायी निघालेल्या मजूरांच्या एका जत्थ्याला भरधाव बसने उडवल्यानं ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ५० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री या दोन्ही घटना घडल्या.

करोनाच्या महामारीपासून बचावासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउननं सर्वात मोठा फटका स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना बसला आहे. गेल्या सुमारे ५० दिवसांपासून देशभरात विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. उद्यापही लॉकडाउन संपण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारे घरी जाण्याचा मार्ग निवडला आहे. यातील काही पायी तर काही एकत्रित वाहनांची व्यवस्था करुन निघाले आहेत.

त्यानुसार, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन बिहारमधील स्थलांतरित मजूर आपल्या घरी पायी निघाले असताना त्यांना घलौली चेकपोस्टजवळ बुधवारी रात्री एका भरधाव बसनं चिरडलं. यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, बुधवारी रात्री घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन निघालेल्या एका ट्रकची बसला जोरदार धडक बसल्याने या ट्रकमधील ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात घडला. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button