breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७८ हजारावर

नवी दिल्ली | देशात कोरोनाव्हायरचा कहर सुरुच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण 26 हजार 235 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा 2549 वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 3722 रुग्ण वाढले असून 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 922 पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही 975 वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button