breaking-newsराष्ट्रिय

विक्रमी ३५ मिलियन टन गव्हाची शासनाने केली खरेदी

नवी दिल्ली : आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी म्हणजेच ३५ मिलियन टनांपेक्षा अधिक गहू खरेदी केल्यानंतर आता उत्तर आणि मध्य भारतात मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी गव्हाचा अतिरिक्त साठा करण्याचे नियोजन शासन करत आहे.

भारतीय अन्न मंडळ आणि राज्यांच्या संस्था या दोघांची मिळून जवळपास ८० मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता आहे. यावर्षी पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे शासकीय संस्थांनी मोठ्या विक्रमी खरेदी केली आहे.

विक्रमी खरेदी करण्यात आल्याने काही प्रमाणात गहू झाकून ठेवण्यात आला असून पंजाब आणि हरियाणा या राज्यांत जोत्याखाली साठा करण्यात आला आहे. पाऊस येण्यापूर्वी हा साठा सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button